धक्कादायक ! बापानेच केला ६ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग
ढाणकी : बापानेच आपल्या ६ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिटरगाव पोलीस स्थानकात नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बापाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ढाणकीपासून जवळच असलेले हिरामण नगर येथील संतोष राठोड (वय 30 वर्षे) याने त्याची स्वतःची मुलगी वय 6 वर्षे ही सोबत झोपली असता त्यानं रात्री दरम्यान पीडित सोबत अतिप्रसंग केला. व कोणाला सांगशील तर जीवे मारून टाकली अशी धमकी दिली. भीतीचे पोटी तिने कोणाला काही नाही सांगितले. परंतु, पीडितला त्रास होत असल्याने तिने तिच्या आईला सांगितले. पिडीतेचा प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे आणून उपचार केला. व रात्री पोलीस स्टेशन बिटरगाव येथे रेखा संतोष राठोड यांनी संतोष राठोड यांचे विरुद्ध रिपोर्ट दिला वरून अप नं. १२२/२०२२ कलम 376(2)(फ)376(2)(आय )506 भादवी सह कलम 4, 6 पोक्सो प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. व आरोपीला तात्काळ अटक केली. पुढील तपास ठाणेदार प्रताप दत्ताञय भोस यांचे मार्गदर्शनमध्ये पोउपनि कपिल म्हस्के पोलीस शिपाई सतीश चव्हाण करत आहे.