महाराष्ट्र
धुळ्यातील देवरे एक्सीडेंट हॉस्पिटलला आग
धुळे (करण ठाकरे) शहरातील मुख्य आग्रा रोड वरील देवरे एक्सिडेंट हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर आज दुपारी अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केले.
रुग्णांसह नातेवाइकांची एकच धावपळ सुरू झाली. कर्मचार्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमधील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बाहेर काढले. रुग्णांना समोरील रसवंती गृहाची ठिकाणी बसविण्यात आले. आगीची माहिती मिळताच (Municipal Corporation) मनपाची दोन (Fire bomb) अग्निशमन बंब दाखल झाले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आग विझविण्याचे काम सुरू होते.