चोपडा येथील प्रा.डॉ.संदीप पवार यांची क.ब.चौ. उमवि येथे अभ्यासमंडळाच्या सदस्य म्हणून निवड
चोपडा (विश्वास वाडे) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय येथील फार्मसुटिक्स विभागातील प्रा.डॉ संदीप रमेश पवार यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे फार्मासुटिक्स या विषयाच्या अभ्यासमंडळात मा. कुलगुरू नामनिर्देशीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रा पवार हे गेली १२ वर्षांपासून चोपडा येते कार्यरत असून चांदसर, ता. धरणगाव येतील रहिवासी आहेत. आपल्या निवडीतून विद्यार्थ्यांना या विषयाचा लाभ मिळवून देऊन संशोधनाकडे वळविण्याचा त्यांचा मानस आहे. या निवडीबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळचे अध्यक्ष भैय्यासाहेब अॕड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा आशाताई पाटील, सच्चीव डॉ. स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ. गौतम पी.वडनेरे, प्रबंधक प्रफूल्ल बी मोरे, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.