शिंदखेडा येथील श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वर पारायण सोहळा निमित्ताने भव्य दिव्य भागवत ग्रंथाचे व कलश ऐतिहासिक एकतेचे दर्शन घडविणारी शोभायात्रा
शिंदखेडा : येथील माळी वाडा मारोती मंदिरात भागवताचार्य प्रकाश महाराज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा व ज्ञानेश्वर पारायण सोहळा निमित्ताने शहरातुन भव्य दिव्य भागवत ग्रंथाचे व कलश शोभायात्रा काढण्यात आली.ही ऐतिहासिक शोभायात्रा शहरातील भाविकांची लक्षवेधी आणि डोळ्यांची पारणे फेडण्यादायी होती. या सत्पाहाचे आयोजन खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळ व महिला मंडळ संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळाचे प्रदेश अध्यक्ष अनिल जगताप सर यांनी शिस्तप्रिय नियोजनाच्या माध्यमातून प्रथमच ऐतिहासिक पहिले शोभायात्रा काढून एकतेचे दर्शन घडविले असल्याचा संदेश दिला आहे.
सुरुवातीला मारोती मंदिरापासून ते शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.हयात सर्वच समाजांतील संत महात्म्यांची पस्तिस ते चाळीस बैलगाडी वर फोटो ठेवल्यात आली होती. तसेच पाच ट्रक्टर वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले , महाराणा प्रताप या महापुरुषांच्या पुतळ्याची सजावट केली होती. संतामध्ये कृष्णा माऊली, नथुसिंग बाबा सह स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, गोरा कुंभार, मिराबाई, चक्रधर स्वामी, महर्षी वाल्मिकी, सावता माळी, रोहिदास महाराज, तुकडोजी महाराज, शबरी माता यासह सर्व संताचा समावेश करित ऐकतेचे दर्शन घडविले होते. लहान मुली व महिला कलश धारी समावेश होता. वीर एकलव्य भजनी मंडळ तसेच मारोती मंदिराचा रथ आणि भागवताचार्य प्रकाश महाराज यांच्या विशेष आश्वारुड रथाचा समावेश भक्तीमय वातावरणात भव्य दिव्य शोभायात्रेत सर्वच समाजांतील भाविक व माजी आमदार रामकृष्ण पाटील सह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ह्यासाठी खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळाचे प्रदेश अध्यक्ष अनिल जगताप, पांडु जिभाऊ माळी, विश्वास भामरे, गणेश परदेशी, दिपक देशमुख, प्रविण माळी, चेतन परमार सह महिला समिती अध्यक्षा रत्नाताई गुरव, सरलाबाई भोई, मंगलबाई माळी, जयश्री पाटील, कोकिळा गुरव, वंदना गुरव, इंदुबाई गुरव, भारती भामरे, विमलबाई गुरव, कलाबाई गुरव, वत्सला माळी,शोभा माळी, कल्पना माळी, अलका गुरव, मिराबाई गुरव, पुष्पा गुरव, सुलोचना भामरे, देवकाबाई कोळी, गुंताबाई माळी, सरला गुरव, कमलबाई परदेशी, वैशाली शिंपी, लिला शिंपी, आशा पाटील,अलका जाधव,भिकुबाई गुरव , सुशिला माळी, गंगाबाई माळी यासह महिला मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. समाप्ती काल्याचे किर्तन भागवताचार्य प्रकाश महाराज यांनी केले तर महाप्रसादाने पारायणाची सांगता करण्यात आली.
गेल्या आठ दिवसांपासून माळी वाडा मारोती मंदिरात भागवताचार्य प्रकाश महाराज यांच्या नेतृत्वाखाली भागात कथा व ज्ञानेश्वर पारायण सोहळा शांततेत पार पडला. ह्यावेळी विश्वास भामरे यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. शहरातील तसेच तालुक्यातील विविध राजकीय , सामाजिक, भाविकांनी भेटी दिल्या. शोभायात्रा काढून एकतेचे दर्शन घडविले असल्याचा एक आमचा मानस सफल झाला. सर्वच समाजांतील भक्त भाविकांची गर्दीने वातावरण भक्तीमय निर्माण झाले होते. शहर व परिसरातील भजनी मंडळी नी सहकार्य केले. म्हणुन आयोजक खानदेश शाहीर कलावंत वारकरी संप्रदाय मंडळ व महिला मंडळ ऋणी आहे.
– प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळ