भुसावळ भाजपातर्फे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी
भुसावळ : आज भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे हिंदूसुर्य,वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भुसावळ शहरातील महाराणा प्रताप चौक येथील स्मारकास भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते माल्यार्पण अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याच प्रमाणे वीरयोद्धा महाराणा प्रताप यांच्या नावाचा जयघोष करून जोरदार घोषणा करण्यात आल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी,जिल्हा चिटणीस शैलजा ताई पाटील, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर, लक्ष्मण सोयंके, गिरीश महाजन, महिला आघाडी शहराध्यक्षा अनिताताई आंबेकर, मनोज पिंपळे, राहुल तायडे, कैलास शेलोडे, बाळुकाका कोळी, अविनाश बऱ्हाटे, चंद्रशेखर पाटील, नरेंद्र ठाकूर, गोपीसिंह राजपूत,अनिरुद्ध कुलकर्णी, नंदकिशोर बडगुजर, अमित असोदेकर, चेतन सावकारे, लोकेश जोशी, अथर्व पांडे, स्वप्निल काळे आदींची व त्याच प्रमाणे समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.