महाराष्ट्र
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील असंघटित कामगार संघाच्या वतीने बांधकाम व इतर कामगारांना नोंदणी कार्डचे वाटप
शिंदखेडा (यादवराव सावंत) दोंडाईचा येथे आज महाराष्ट्र असंघटित कामगार संघ दोंडाईचा यांच्या सौजन्याने इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्या मेळावा घेण्यात आला. यात बांधकाम कामगारांना नोंदणी कार्ड विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास महाराष्ट्र असंघटित कामगार संघाचे अध्यक्ष व नगर परिषदेचे मा. नगरसेवक हितेंद्र महाले, नगरपरिषचे माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील हे उपस्थित होते. यांच्या हस्ते इमारत व इतर बांधकाम कामगारांना नोंदणी कार्ड वाटप व विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले व कामगारांना सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र असंघटित कामगार संघाचे अक्कबाई महाजन, अरुणाबाई सराफे, भारतीबाई कोळी, पंकज ठाकूर हे उपस्थित होते. व त्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.