केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांची वडगावकडेला भेट
पाचोरा (प्रतिनिधी) वडगावकडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे कन्नड विधानसभा मतदार संघात एका कार्यक्रमासाठी आले असतांना त्यांनी वडगावकडे येथे धावती भेट घेवून जि.प सदस्य मधुकर काटे यांच्यासह कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अर्धातास त्यांनी गावात कार्यकर्त्यांशी चर्चा करून विकास कामांबाबत माहीती घेतली.
वडगावकडे नजिकच असलेल्या बनोटी येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे कार्यक्रमासाठी आले होते. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून तेथुन त्यांचा ताफा वडगावकडे या गावात आल्यानंतर जि.पसदस्य मधुकर काटे यांनी त्यांचे स्वागत,सत्कार केला. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मधुकर काटे यांच्या निवासस्थानी त्यांनी त्यांच्याकडून आगामी जि.प निवङणूकांसह जिंल्ह्यातील पक्षातील संघटनात्मक आढावा जाणून घेतला. यावेळी ईद्रीस मुलताने,सुरेश बनकर, पिंपळगाव हरेश्वरचे परेश पाटील,वडगावकडेचे सरपंच मच्छिंद्र तडवी, उपसरपंच विकास पाटील, गजानन पाटील, पो.पाटील सुनील पाटील, आर.के.पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.