सावित्रीमाई फुले जयंती निमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
अमळनेर (प्रतिनिधी) येथील साईबाबा सार्वजनिक वाचनालय येते क्रांतिज्यीती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम नगरसेविका ज्योती धनंजय महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला व सावित्रीबाई फुले जीवनकार्यावर आधीरीत पुस्तिका वाटप करण्यात आले. सावित्रीमाई फुले महिला मंडळ च्या उपाध्यक्षा ज्योत्स्ना प्रमोद जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्या विषयी कविता सादर करून मनोगत व्यक्त केले. कर्तृत्ववान महिला साईबाबा वाचनालयाच्या ग्रंथपालिका प्रतिभा महाजन यांच्या यावेळी शाल श्रीपळ पुस्तिका गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेविका ज्योती धनंजय महाजन, सावित्रीमाई फुले महिला मंडळ उपाध्यक्षा ज्योत्स्ना जाधव, साईबाबा वाचनालयाच्या ग्रंथपालिका प्रतिभा महाजन, संगीता महाजन, सरला भोई, मंगला चौधरी, मीना मराठे, निर्मला पाटील, शोभा पाटील, मिनू पाठक, सविता पाटील आदी महिला मंडळ सदस्य उपस्थित होते. कार्येकर्माचे सूत्र संचालन ज्योत्स्ना महाजन यांनी तर आभार प्रतिभा महाजन यांनी मानले.