प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये कडून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची पाहणी
मेळघाटात विविध कार्यक्रम आणि अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार
मेळघाट : कार्यरत वनकर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवा प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची पाहणी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांचे निर्देश वनकर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
मेळघाट वनांचे संरक्षण करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक सुनील लिमये यांनी संबंधितांना दिले. प्रकल्पातील विविध ठिकाणांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर गुगामल वन्यजीव विभागातील कोहा नाक्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी एसटीपीएफ कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. धुळघाट वन्यजीव परिक्षेत्रात चिचाथावडा येथे वनसंरक्षक प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी नुकतीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची पाहणी केली.
यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य वनसंरक्षक तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालक जयोती बॅनर्जी, औरंगाबाद वनवृत्त मुख्य वनसंरक्षक सत्यजीत गुजर आदी यावेळी उपस्थित होते. सदर दौऱ्यात सुनील लिमये यांनी व्याघ्र धारगड वनपरिक्षेत्र मुख्यालयालाही सुनील लिमये यांनी भेट दिली. वन वणवा नियंत्रण व वनसंरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोजंदारी वनमजूर, वनमजूर, वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी, साहाय्यक वनसंरक्षक, उपवनसंरक्षक यांचा गौरव यावेळी सुनील लिमये यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वनकामगार व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, धुळघाट वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहणकर, विभागीय वनाधिकारी नवकिशोर रेड्डी, साहाय्यक वनसंरक्षक इंद्रजीत निकम, विभागीय वनाधिकारी मनोज खैरनार आदी दौऱ्यादरम्यान उपस्थित होते. कुटीचे उद्घाटनही सुनील लिमये यांच्या हस्ते करण्यात आले. ही बनसंरक्षक कुटी महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. सालई झाडाचा गोंद काढण्यासाठी होणारे करवे व अवैध चराई रोखण्यासाठी ही कुटी महत्वपूर्ण आहे. कोरकू बांधवांच्या लोकनृत्याचा कार्यक्रमही यावेळी पार पडला. अकोट आणि गुगामल वन्यजीव विभागातील अतिदुर्गम भागातील कोकरजांबू व गुगामल संरक्षक कुटींनाही प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी भेट दिली.