दिपनगर येथे हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी
भुसावळ (प्रमोद बावस्कर) नगर येथील नवीन क्लब मध्ये महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सुरुवातीला महाराणा यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंतीला सुरुवात झाली. त्यानंतर जयंतीचे मुख्य अतिथी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांची समाज उद्बोधनपर सभा पार पडली. सुरुवातीला समितीचे सचिव अश्विन शेकरवार यांचे चिरंजीव हर्षद शेकरवार यांनी महाराजांवर आधारित काव्य स्वरूपात कविता सादर केली.
भूषण पाटील यांनी प्रास्ताविक केले व महाराणा प्रताप यांचा इतिहास सांगितला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरसिंग परदेशी यांनी देखिल मार्गदर्शन केले. महाराणा जयंती ही सर्व राजपूत समाज बांधवांनी आपल्या सहपरिवारासोबत जल्लोषात साजरी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण पाटील यांनी केले तसेच अश्विन शेकरवार आणि संदीप राजपूत यांनी सर्व उपस्थित सर्व राजपूत समाज आणि मान्यवरांचे आभार मानले. राजपूत समाज समिती, दीपनगरच्या खालील पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले. अध्यक्ष अमरसिंग परदेशी, उपाध्यक्ष प्रशांत सिसोदे, सचिव अश्विन शेकरवार, विशेष सहकार्य सी.डी.पाटील, संदीप राजपूत, भूषण पाटील, राजू राजपूत, पंकज पाटील, अनिल पाटील, कैलास पाटील, अमोल सालोक, खुषालसिंग पवार, जी. के.पाटील, समस्त राजपूत समाज बांधव उपस्थित होते.