आगामी गणेशोत्सव विर्सजनाच्या पार्श्वभुमीवर पोलीस उपमहानिरीक्षक यांनी घेतली आढावा बैठक
अमरावती : जिल्हयात आगामी होणाऱ्या गणेशोत्सव विसर्जन संबधाने चंद्र किशोर मीना, पोलीस उपमहानिरीक्षक, अमरावती परीक्षेत्र, अमरावती यांनी अमरावती ग्रामिण जिल्हयातील सवंदेनशिल पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी यांची बैठक पोलीस स्टेशन अचलपुर येथे घेतली.
बैठकी मध्ये पोलीस स्टेशन हददीतील सवंदेनशिल ठिकाण, तसेच उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ता करीता आवश्यक असलेला मनुष्यबळ, व उत्सवा संबधाने करण्यात आलेली प्रतिबंधक कार्यवाही तसेच विर्सजन मार्ग याबाबत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेवून उपस्थित प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकी करीता अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रा. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. उपविभागिय पोलीस अधिकारी, व ठाणे प्रभारी अधिकारी हजर होते.