महाराष्ट्र

शिंदखेडा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्षपदी भाजपाचे प्रकाश नागो देसले यांची निवड

शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेड़ा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष भिला बारकू माळी यांनी राजीनामा दिल्याने आज दि ४ जून रोजी नगरपंचायत येथे उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे नियोजन करण्यात आले होते. या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा रजनी ताई वानखेड़े सह मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी कामकाज पाहिले.

आमदार जयकुमार रावल यांच्या आदेशानुसार व गटनेते रावसाहेब अनिल वानखेड़े, भाजपा जि.अध्यक्ष नारायण पाटील व माजी. जि.पं. सदस्य कामराज निकम यांच्या सूचनेनुसार ,भाजपाच्या वतीने प्रकाश नागो देसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता व कॉंग्रेस च्या वतीने उदय देसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, भाजपाचे उमेदवार प्रकाश नागो देसले यांची १० विरोधात ४ मते अशी निवड झाली या विशेष सभेत, समाजवादी पक्षाचे २ व काँग्रेस पक्षाचे २ नगर सेवक मिरा मनोहर पाटील व दिपक दशरथ अहिरे गैरहजर होते, गैरहजर नगरसेवक यांना शिंदखेड़ा शहराचा विकास मान्य नसल्याने ते या सभेसाठी उपस्थित नाहीत अशी चर्चा शहरात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या वतीने उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता.आणि काँग्रेसचे च दोन नगरसेवक गैरहजर होते. नवनियुक्त उपनगराध्यक्ष प्रकाश आप्पा देसले यांना आमदार जयकुमार रावल व गटनेते रावसाहेब अनिल वानखेड़े, भाजपा जि.अध्यक्ष नारायण पाटील व माजी.जि. प. सदस्य कामराज निकम यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच नगरसेवक भिला बारकू माळी, नगरसेवक किसन जगन सकट, नगरसेविका योगिता विनोद पाटील, नगरसेविका वंदना चेतन परमार, नगरसेविका भारती जितेंद्र जाधव, नगरसेविका निर्मला युवराज माळी व नगरसेविका नर्मदा अर्जुन भील,अरुण देसले यांनी देखील अभिनंदन केले तसेच शहराध्यक्ष भाजपा प्रविण माळी, युवराज नाना माळी, अॅड. विनोद पाटील, चेतन परमार, जितेंद्र जाधव,अर्जुन भील, दादा मराठे, कुणाल देसले, करण देसले यांच्या सह शहरातील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे