राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासकीय मदतीचे वाटप
विवेक महाजन तालुका प्रतिनिधी
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.27, सिल्लोड तालुक्यातील तलवाडा, गव्हाली, व बोरगाव कासारी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते प्रत्येकी एक लाख रुपयांच्या शासकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप शनिवार ( दि.27 ) रोजी येथील तहसील कार्यालयात करण्यात आले.
यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, डॉ.संजय जामकर, डॉ. मॅचिंद्र पाखरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, शेख सलीम हुसेन, राजू गौर, नॅशनल सूतगिरणीचे संचालक मारुती वराडे, नामदेव उबाळे , नायब तहसीलदार प्रभाकर गवळी, अव्वल कारकून शिवाजी सोनवणे,बालाजी पालेकर, महसुल सहाय्यक श्री. शिसोदे, दुर्गेश गिरी यांच्यासह तळवाडा येथील उपसरपंच कृष्णा खरात, गजानन दौंगे, सुधाकर शिंदे , माजी सरपंच ज्ञानेश्वर जाधव, रमेश ब्राम्हणे, शिवानंद कांबळे आदींची उपस्थिती होती.
सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे तालुक्यातील तळवाडा येथील शेतकरी आनंदा भास्कर सावळे , गव्हाली येथील शेतकरी अण्णा कडूबा शिंदे तसेच बोरगाव कासारी येथील शेतकरी पुंडलिक गणपत आहेर यांनी आत्महत्या केली होती. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत शासनास पाठपुरावा करून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सदरची मदत मिळवून दिली. त्याअनुषंगाने आत्महत्याग्रस्ताचे वारस मीराबाई आनंदा सावळे रा. तळवाडा, शेणफडाबाई अण्णा शिंदे रा.गव्हाली तसेच मंगलाबाई पुंडलिक आहेर रा. बोरगाव कासारी यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या शासकीय मदतीचे धनादेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते तहसील कार्यालयात वाटप करण्यात आले.