प्रकाशचंद जैन फार्मसी येथे मेगा कॅम्पस ड्राईव्ह संपन्न ; ३३ विद्यार्थ्यांची निवड
जामनेर : पळासखेडा येथील श्री. प्रकाशचंद जैन फार्मसी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये दि. २५ मे २०२२ रोजी कॅम्पस इंटरव्ह्यू झाला. यात ३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रकाशचंद जैन बहुद्देशीय संस्थेअंतर्गत श्री. प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्रीतम इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड रूर्की, हरिद्वार (उत्तराखंड) या कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले. यात द्वितीय वर्ष डी. फार्मसी व अंतिम वर्ष बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या १५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यातून 33 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
शिक्षण पूर्ण होण्याआधीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली. मुलाखतीसाठी मलकापूर, अकोला, नागपूर, पाचोरा, जळगाव, भुसावळ, शिरपूर, चाळीसगाव येथून विदयार्थी आलेले होते. कंपनीचे मॅनेजर नागेंद्र पांडे, राजेश सिन्हा एच आर मॅनेजर, बाळासाहेब मुखेकर क्वलिटी अशुरन्स हेड, चेतन इंगळे आय टी प्रोफेशनल यांनी व्यक्तिगत मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली. आलेल्या विद्यार्थ्यांना 2 ते 2.50 लाख रुपये एवढे वार्षिक वेतन मिळणार आहे. ‘शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणे हे सुद्धा आपलेच दायित्व आहे’ अशी भावना संस्थेचे सचिव श्री. मनोजकुमारजी कावडीया यांची आहे. या संकल्पनेचा एक भाग म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयुर भुरट यांनी या मेगा कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन केले. मेगा कॅम्पस ड्राईव्हच्या या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. मयूर भुरट यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. सुनील बावस्कर समवेत प्रा. प्रफुल्ल पाटील, प्रा. भुषण गायकवाड आणि प्रा. स्वप्निल फालक यांनी मेहनत घेतली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडीया, सचिव मनोजकुमार कावडीया आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयुर भुरट यांनी कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.