तालुकास्तरीय PMFME कार्यशाळा तसेच खरीप हंगाम बीजप्रक्रिया मोहीम शुभारंभ कार्यक्रमाचे गोवेली गावामध्ये आयोजन
ठाणे : आज चेतन दुर्वे फार्म गोवेली याठिकाणी तालुकास्तरीय PMFME कार्यशाळा तसेच खरीप हंगाम बीजप्रक्रिया मोहीम शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसन कथोरे (आमदार मुरबाड विधानसभा )हे होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना कुमार जाधव (तालुका कृषी अधिकारी कल्याण)यांनी केली त्यानंतर खरीप हंगाम 2021 मध्ये भात पीक स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करून किसन कथोरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देण्यात आले तसेच पंचायत समिती कल्याण यांचेमार्फत 50% अनुदानावर उपलब्ध असलेले भात बियाणे देखील त्यांच्याच हस्ते वाटप करण्यात आले. त्यानंतर मोहन वाघ(जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे)यांनी कृषी विभागाच्या योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करून तरुण शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याविषयी आव्हान केले. दशरथ घोलप (तंत्र अधिकारी ठाणे)यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना(PMFME) या योजनेविषयी माहिती दिली.
किसन कथोरे आमदार मुरबाड विधानसभा यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये शेती न विकता त्या शेतीमध्ये कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले. त्यानंतर रुपेश चोरगे गोवेली यांच्या PMFME योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दुग्ध व्यवसाय प्रकल्पाचे उद्घाटन करून पुढील व्यवसाय शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी रेश्मा भोईर (उपसभापती पंचायत समिती कल्याण) रवींद्र घोडविंदे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण), तसेच पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली भापसे (BTM आत्मा)यांनी केले व आभार भगवान पथारे (मंडळ कृषी अधिकारी) यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी पर्यवेक्षक व सर्व कृषी सहाय्यक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.