मनयशस्वी फाऊंडेशन यवतमाळ कार्यकारिणीमध्ये तीन पदाधिकाऱ्यांचा सामावेश
यवतमाळ : मनयशस्वी फाऊंडेशन यवतमाळ च्या कार्यकारणी मध्ये तीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यवतमाळ येथील ऍड. रोशन जगभिये यांची फाऊंडेशन च्या कार्याध्यक्षपदी, तर बाभूळगाव तालुक्यातील कपिल घावडे यांची प्रचार प्रमुख व नेर तालुक्यातील तेजस चव्हाण यांना संघटक म्हणून या पदावर नियुक्ती पत्र देऊन नियुक्त करण्यात आले आहे.
संस्थेच्या पदाधिकारी निवड समितीच्या शिफारशी नुसार बैठकीत चर्चा करण्यात आली तसेच सर्वानुमते तिघांना पदावर नियुक्ती केल्या गेल्या. एक जबाबदार व दक्ष नागरिक म्हणून आपण महासंघाने आपणास दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडावी ही अपेक्षा आहे. विद्यार्थी व सामान्य व्यक्तीवर होणाऱ्या अन्याय विरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न करणे, विद्यार्थी व महिलान मध्ये कायद्याची जनजागृती करणे हा आपला उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी आपण या कार्यात समर्पित वृत्तीने प्रामाणिकपणे कार्य कराल हा विश्वास आहे. पदाधिकारी म्हणून आपण जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी सभासद नोंदणी अर्ज हा संस्थेच्या अधिकृत व्हाट्सअँप वर मागणी केल्यास मिळून जाईल आपण पदाधिकारी म्हणून नियम व अटी चे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.