महाराष्ट्र

२ हजार रुपयांच्या नोटा चलनातून गायब ; RBI नं नोंदवलं निरीक्षण

गेल्या आर्थिक वर्षात इतक्या टक्क्यांची घट

नवी दिल्ली : मागील काही दिवसांत अर्थव्यवस्थेतून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचं निरीक्षण नुकतंच आरबीआयने नोंदवलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्च २०२२ च्या संपलेल्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटात १२.६० टक्क्यांची घट झाली आहे.

गेल्या वर्षी हा आकडा २४ हजार ५१० लाख इतका होता. तर २०२० मध्ये अर्थव्यवस्थेत २७ हजार ३९८ लाख २ हजार रुपयांच्या नोटा होत्या. गेल्या दोन वर्षांत चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येत २१.८१ टक्क्यांनी घट झाली आहे. विशेष म्हणजे आरबीआयने गेल्या चार वर्षात दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचा पुरवठा केलेला नाही. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर आरबीआयने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत २,००० रुपयांची नोट बाजारात आणली होती. तसेच २०१६ मध्ये नव्याने डिझाइन केलेली ५०० रुपयांची नोटही आरबीआयने बाजारात आणली होती.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचे मूल्य मार्च २०२२ मध्ये १२.६० टक्क्यांनी घसरून ४२८,३९४ कोटी रुपयांवर आलं आहे. जे गेल्या वर्षी ४९०,१९५ कोटी रुपये इतकं होतं. दुसरीकडे, मार्च २०२२ मध्ये चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या वाढली असून सध्या बाजारात ४५५,४६८ लाख ५०० रुपयांच्या नोटा आहेत. मागील वर्षी बाजारात ३८६,७९० लाख नोटा होत्या, अशी माहिती मध्यवर्ती बँकेनं आपल्या वार्षिक अहवालात दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात आरबीआयने ५०० रुपयांच्या १२८,००३ नोटांचा पुरवठा केला होता, असंही आरबीआयने म्हटलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे