भाजपतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण
जळगाव : आज दि.२८ मे रोजी जळगाव शहरातील स्वतंत्र चौकातील गांधी उद्यान येथे महान देशभक्त, प्रखर क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ, तर्कसिद्ध हिंदुत्वाचे भाष्यकार आणि समाजसुधारक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला (पुतळ्याला) माल्यार्पण भारतीय जनता पार्टी जळगाव चे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी महापौर सीमाताई भोळे, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, सुशील हसवणी, सुभाष तात्या शौचे, कार्यालय मंत्री गणेश माळी, राजेंद्र मराठे, प्रकाश पंडित, अक्षय चौधरी, मंडल अध्यक्ष रमेश जोगी, केदार देशपांडे, नगरसेवक धीरज सोनवणे, अमित काळे, महिला आघाडी अध्यक्ष दीप्ती ताई चिरमाडे, प्रल्हाद सोनवणे, हेमंत जोशी, कुमार सिरामे, मंगेश जुनागडे, शांताराम गावंडे, चेतन तिवारी, जयेश लोकचंदानी संजय भावसार, राहुल मिस्त्री, दिनेश पुरोहित, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.