महाराष्ट्रात आज पर्यंत दंगली घडवण्याचे कारस्थान कोणाचे ? हे जनतेला माहिती आहे : आ.सुरेश भोळे
जळगाव : आजपर्यंत महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे कारस्थान कोणी केले आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेला समजले आहे. राज्यात तिघाडी सरकार ची सत्ता असून सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर राज्यात कोणताही मंत्री व नेता बोलण्यास तयार नाही. त्याऐवजी जनतेची दिशाभूल करण्याचा राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात कुठे ना कुठे बोलताना आघाडी सरकार मध्ये असलेले पक्ष व त्या पक्षांमधील काही पदाधिकारी जळगावात येऊन म्हणतात, असं जिल्हाध्यक्ष आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा भोळे) म्हणाले.
“भाजपाचा दंगली घडवण्याची डाव माननीय मुख्यमंत्री यांनी हाणून पाडला आहे” या महाराष्ट्रात जनतेला माहिती आहे, जातीय तेढ निर्माण करून विकासाचा मुद्दा बाजूला केला जातो. या राज्यात जनतेने भाजपाच्या नावाने आपल्याला बहुमत दिले होते परंतु तुम्ही आज भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून मागच्या दाराने सत्तेत आला आहात, हे विसरू नये. खरेतर तिघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या वीज तोडणी विषयी समस्या सोडविण्याचा, एस.टी. कामगारांचा मागण्यांचा सहनुभूतीपृवक विचार करून त्यांचा संप मिटविण्याचा, लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न यावर लक्ष केंद्रित करावे, परंतु तिघाडी सरकार याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्रातील जनतेला राजकारणात अडकवून राजकीय भूलताफांना बळी पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.
भारतीय जनता पार्टी ही नेहमी राष्ट्रहितासाठी व जनतेच्या हितासाठी काम करत असते. महाराष्ट्रात बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या पक्षातील पदाधिकारी यांनी राज्यात सत्तेत असलेल्या त्यांच्याच सरकारने केलेल्या कामांविषयी बोलावे. भलत्याच एखाद्या विषयावर जनतेचे लक्ष विचलित करणे व विकासाचा मुद्दा बाजूला करणे, अशा फालतू गोष्टी मध्ये जनतेला अडकवण्याचा प्रयत्न करू नये. आपलं सर्व खोटं नाटक हे महाराष्ट्रातील जनतेने खुल्या डोळ्यांनी बघितले आहे. महाविकास आघाडी सरकारचा बोल बाला हा जनतेसमोर जास्त दिवस राहणार नाही.