वन्य प्राण्यांपासून शेतीपिक नुकसान ग्रस्त शेतकरी वर्ग वाऱ्यावर ; शेतकरी परिषदेत आरोप
एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील विखरण चोरटकी, रिंगणगाव, खर्ची बुद्रुक, उमरदे, पिंपलकोठा, खडकी, खर्ची, खुर्द, म्हसावद, पद्मालय, रवांजा, आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जंगलातील रानडुकरं, नीलगाई, हरणे, कळपा कळपने येऊन मका सूर्यफूल, सोयाबीन, दादर, आदी पिके खातात आणि विध्वंस करून निघून जातात. ५० टक्केही उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येत नाही, यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत, या शेतकऱ्यांना सरकारने वार्यावर सोडले आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेच्या विखरण येथे माळी समाज मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या शेतकरी परिषदेत करण्यात आला.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच जयंत महाजन होते. या परिषदेला स्वागताध्यक्ष म्हणून हिम्मतराव महाजन यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या आपल्या प्रास्तविक भाषणात मांडल्या. सावता माळी वाचनालयतर्फे गुणी विद्यार्थी सैनिक आदर्श शेतकरी सेवा निवृत्त कृषी मनपा अधिकारी यांचा सत्कार किसन सभा नेते व गावातील मान्यवर नेते यांचे शुभ हस्ते केले.
त्यावेळी भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते कॉम्रेड अमृत महाजन यांनी आपल्या घणाघाती भाषणात सांगितले की, शेतकऱ्यांना एकीकडे शेती मालाला भाव नाही. दुसरीकडे निसर्ग साथ देत नाही आणि तिसरी कडे वन्य प्राणी शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त करतात. या सरकारला या शेतकऱ्यांच्या नुकसानीची जाणीव ना, त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हावे असे आवाहन त्यांनी केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ांबळे लक्ष्मण शिंदे यांनीही यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी एकजूट केली तर काय होते? हे दिल्ली शेतकरी आंदोलनावरून लक्षात आले. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावी लागले तसेच या परिषदेचे मुख्य वक्ते एडवोकेट हिरालाल परदेशी यांनी वन कायदा, वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांची नुकसानी व सरकारचे कर्तव्य यावर प्रकाश पाडतांना सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्यांची ताबडतोब पंचनामे करणे गरजेचे आहे. तलाठी यांनी पंचनामे करावेत ऑनलाइन अर्जाचा घोळ घालू नये असे आवाहन केले.
दिलीप चौधरी, अर्जुन कोळी यांनीही परिषदेला मार्गदर्शन केले. परिषदेतील ठराव शेतकरी जागरण सभा घेण्यात येतील. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल नुकसान भरपाई वाढ मागणीसाठी जिल्हाव्यापी सह्यांची मोहीम राबविण्यात येईल.
तसेच जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना निवेदने देण्यात येतील. किसान सभा राज्य अधिवेशन २८/२९ एप्रिल शिरपुरला होणार असून तेथेही ठराव मांडण्यात येतील
शासनाला इशारा
ज्या शेतकऱ्यांवर दोन लाखाच्या वर कर्ज आहे . दोन लाखाच्या वर कर्ज होते अशा शेतकऱ्यांना ताबडतोबीने कर्ज माफी मिळावी
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती व वनखाते हद्दी दरम्यान टिकाऊ तारेचे कंपाउंड बनवावे. ताबडतोब शेतात जाऊन पंचनामे करा
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एम एस पी प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी महसूल खाते व वनखात्याने शेतकऱ्यांनी दिलेल्या सामायिक अर्जानुसार शेतकऱ्यांचा नुकसानीचे पंचनामे करावेत ऑन लाईन अर्जांचा घोळ घालू नये अन्यथा मे महिन्यात नुकसानीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे जिल्हा व्यापी आंदोलन १ मे रोजी छेडण्यात येईल असा इशारा शासनाला देण्यात आला
या परिषदेत एरंडोल तालुका किसान सभेची कार्यकारिणी निवडण्यात आली. ती अशी.. अध्यक्ष कामरेड हिम्मतराव महाजन, कार्याध्यक्ष जयंत हिरामण महाजन, उपाध्यक्ष उत्तम महाजन खर्ची बू., सचिव विष्णू चव्हाण रिंगणगाव, सहसचिव रामचंद्र पाटील चोर टक्की, खजिनदार दिलीप चौधरी सल्लागार, रोहिदास मिस्तरी तसेच सभासद असे भागवत चौधरी, रिंगणगाव तुकाराम पडवळ, डी आर पाटील उमर्दे, सुरेश उत्तम पाटील चोरटकी ,गोपाल देशमुख , गंभीर महाजन, शांताराम महाजन, वासुदेव महाजन, रवींद्र पाटील पाटील, एकनाथ महाजन, दगडू महाजन, कैलास मिस्त्री, दिलीप 23 शेतकऱ्यांचे एक समिती तयार करण्यात आलेली आहे. परिषद यशस्वी करण्यासाठी उपरोक्त सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सभासदांव्यतिरिक्त रामा चौधरी, पांडुरंग महाजन, बापू पाटील भुषन माळी, ज्ञानेश्वर माळी, इंदुबाई महाजन यांनी परिश्रम घेतले.