शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथील सुवर्णा पाटील यांची पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील नेवाडे येथील इच्छाशक्ती गणपती मंदिराजवळ सुवर्णा बाळु पाटील यांची एम.पी.एस.सी.परीक्षेत ओबीसी संवर्गातुन राज्यात 21 व्या क्रंमाकाने पीएसआय पदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व नेते संदिप बेडसे, माजी सभापती प्रा.सुरेश देसले , स्वामी समर्थ संस्था चेअरमन आर.आर.पाटील, पोलिस निरीक्षक सुनील भाबड , पीएसआय रविंद्र केदार , चेअरमन सुरेश जाधव, कृउबा संचालक मोतिलाल जाधव, ज्ञानेश्वर पवार, अशोक पवार, शिवदास देसले, जयवंत साळुंखे, हंसराज जाधव, रमेश पवार, देविदास पुंडलिक पवार,मोहन जाधव,बाळु नथ्थु पाटील, ताराबाई बाळु पाटील, बापु पाटील, विजया पाटील , मुख्याध्यापक डी.एम.सुर्यवंशी आदीची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक बी.एस.पवार , सुत्रसंचलन व्ही.डी.पवार, यांनी केले. यावेळी पीएसआय पदी नियुक्ती झाल्याबद्दल सुवर्णा पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार रामकृष्ण पाटील व संदीप बेडसे, सुनील भाबड , सुरेश देसले,आर.आर.पाटील सह नागरिकांनी साडी, शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मनोगतातून रामकृष्ण पाटील, संदिप बेडसे, सुरेश देसले, सुनील भाबड, अपुर्वा जितेंद्र जाधव यांनी सुवर्णा पाटील यांनी अत्यंत गरिबीची परिस्थितीतुन शिक्षण घेवून यश संपादन केले म्हणून अशा जिद्दी मुलीचे आदर्श तरुणांनी घेवून आपल्या आई वडिलांचे नाव रोषण करावे असे सांगितले. सत्काराला उत्तर देताना सुवर्णा पाटील यांनी सांगितले की, नेवाडे गावातील माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी गावात अनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या माध्यमिक शाळेत दहावी पर्यंत चे शिक्षण घेतले. शिंदखेडा येथील स्वामी समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात शिकण घेऊन उच्च शिक्षण जळगाव एम.जे. महाविद्यालयात एम.स्सी.गणित चे शिक्षण घेतले.माझे वडील बाळु पाटील, आई ताराबाई पाटील यांनी शेतमजुरी करून आम्हा तीन ही मुलींना उच्चशिक्षित केले.आम्हाला भाऊ नसल्याने देखील उणीव भासु दिली नाही. म्हणुन आज गरिबीतून ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळेतुन शिक्षण घेवून हया पदावर पोहोचलो त्याचे श्रेय गुरुजनांना जाते, असे सांगितले. हया तिन्ही जिद्दी मुली बाबत सुवर्णा ने सुवर्ण दिवस उगवला, धनश्री च्या माध्यमातून धनाची तर प्रतिक्षा द्वारा प्रतिक्षेची वेळ आली आहे.