शिंदखेडा येथे ऐतिहासिक पहिले भिल महासंमेलाचे शानदार उद्घाटन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील विरदेल रोड साईलीला येथे भव्य मंडपात शिंदखेडा शहरात भिल महासम्मेलनाची अनोखी सुरुवात झाली. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, बुलढाणा येथून सुमारे 5000 भिल्ल बांधव हे संमेलनात उपस्थित होते.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा सीमाताई वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी , बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सीनेटचे सुनिल गायकवाड , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास दादा नाईक, रेणुका गुलाबसिंग सोनवणे, साहिल तडवी, कृष्णा गावित, दिलीप मोरे, किरण सोनवणे, जया सोनवणे, यशवंत पवार जि प सदस्य नाशिक, गोपाळ मोरे, रोशन गावित, कैलास पवार मालेगाव , शरद माळी देवळा,जमानेकर रावसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मंडपा पर्यंत रॅलीने झाली त्यानंतर आदिवासी समाजाचे क्रांतिवीर यांच्या प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.प्रास्तवीक दिपक अहिरे यांनी केले. त्यानंतर भिल समाज व्यथा व विविध माहिती पुस्तिका चे प्रकाशन करण्यात आले. भिल समाजाच्या विकासाच्या तसेच इतिहासाच्या अनेक गौरवास्पद बाबींवर मान्यवरांनी भाष्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्षांनी भिल संमेलनाचा पहिला प्रयत्न शिंदखेडा तालुक्यात दीपक अहिरे यांनी घडवून आणला तो ऐतिहासिक आहे आणि यात भिल्ल समाजाचे एकीकडे व उन्नतीकडे वाट नक्कीच वाटचाल करेल याबाबत, आशावाद बोलून दाखवला माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आपल्या भाषणात सांगितले की अशाच प्रकारे समाजाने एकत्र आले पाहिजे जेणेकरून समाजाची उन्नती साधली जाईल.
आदिवासी एकता परिषदेचे राज्य सचिव डोंगर भाऊ बागुल यांनी येथील कार्यक्रमात उपस्थिती लावली त्यांच्या भाषणात ते म्हणाले की आदिवासी समाजाने एकत्र येण्याची खूप गरज आहे आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास हेतूपुरस्पर दाबला गेला आहे त्या उज्वल इतिहासाची जाणीव समाजात वेळोवेळी करून दिली पाहिजे जेणेकरून समाजाच्या उज्ज्वल इतिहासाची पुढच्या पिढीस माहिती मिळेल. ह्यावेळी विविध आदिवासी कलाविष्कार सादर केले. प्रसंगी खान्देश रक्षक संस्थेच्या आजी माजी सैनिकांचा तसेच समाजातील कलाकार यांचा गोरव करण्यात आला.
ह्यासाठी भिल समाज विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, दिपक अहिरे एरंडोल, सुभाष पवार मालेगाव, प्रविण पवार, सोमपुर सटाणा,bसुरेश भिल बागलाण, चंद्रकांत सोनवणे, गणेश सोनवणे , बापुजी फुले, बळीराम निकम, राजु सोनवणे, भाऊसाहेब मालचे, नगरसेविका संगीता सोनवणे, हिराबाई सोनवणे, उषाताई सोनवणे, श्रीराम मोरे, अशोक मालचे, राजेश मालचे,न्हानभाऊ सोनवणे, किरण चित्ते, शरद ठाकरे, राहुल ठाकरे, मच्छिंद्र ठाकरे, कालु मोरे, विद्यार्थी शाखा जिल्हाध्यक्ष राहुल अशोक सोनवणे, शामा ठाकरे, भटु मालचे, बुधा ठाकरे, धनराज पहेलवान, भरत पाटील, सागर चित्ते, अजय मराठे, उमेश सोनवणे चे टायगर गृप कार्यकर्ते यासह शिंदखेडा तालुक्यातील व भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतली. संमेलनाचे सुत्रसंचलन संजय पवार व चंद्रकांत सोनवणे यांनी केले.