धोंदलगाव ते बाबुळगाव रस्त्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा लढा !
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) तालुक्यातील धोंदलगाव ते बाबुळगाव रस्त्याचे तीन तेरा नऊ बारा भारत स्वतंत्र होऊन 70 वर्षे पूर्ण झाले आहे. तरीही रस्त्यांसाठी सर्वसामान्य नागरिक लढा देत आहे. तसंच धोंदलगाव, बाबुळगाव गारज व मनुर धोंदलगाव बाबुळगाव हा रस्ता दळणवळणासाठी सोयीस्कर असून हा रस्ता आठ ते दहा वर्षापासून खड्डेमय होऊन गेलेला आहे.
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही. त्यामुळेच धोंदलगाव येथील नागरिक खूप त्रस्त आहे. गावातील अनेक नागरिकांना शारीरिक वेदना सोसाव्या लागत आहेत. मणक्याचा त्रास गावामध्ये अनेक नागरिकांना होत असून वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मनुर येथील शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी हा रस्ता खूप उपयोगी पडतो. पण, या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिक फार त्रस्त झालेले आहेत.
ज्याप्रमाणे एखाद्या गावाला वाळीत टाकल्या जाते. त्याचप्रमाणे या रस्त्याला ही शासनाने वाळीत टाकले आहे की काय? असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी वैजापूर तालुक्यातील शासन व लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे असे नागरिकांमध्ये चर्चा आहे. चर्चे संदर्भात गावातील नागरिक अतुल जीवरक, शुभम डमाळे, संतोष दळे, प्रदीप जीवरक, नितीन डमाळे, किरण डमाळे, अण्णा डमाळे, बाबासाहेब वाघ, विठ्ठल डमाळे.