गुन्हेगारी
तरुणावर तलवारीने हल्ला
धुळे (स्वप्नील मराठे) तालुक्यातील चिंचखेडा मुकटी येथे तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याविषयी सुनील मराठे नामक तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार समाधान पाटील, अंकित पाटील, रोहित पाटील व रमेश पाटील यांनी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून तलवारीने प्राणघातक हल्ला केला. घटनेबद्दल धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.