समस्त मानव जातिचे गुरुवर्य म्हणून काशीगिरी महाराजांचे नावलौकिक ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन
सिल्लोड : नैसर्गिक व आध्यत्मिक वारसा लाभलेल्या श्री. मुर्डेश्वर संस्थानच्या जतन, सुशोभीकरण व संवर्धनासाठी काशीगिरी महाराज यांनी प्रदीर्घकाळ काम केले. अध्यात्म सोबत सामान्यांना मदत करण्यासाठी वैकुंठवाशी काशीगिरी महाराज यांचा कायम पुढाकार असायचा असे स्पष्ट करीत काशीगिरी महाराज यांचे कार्य प्रेरणादायी असून समस्त मानव जातिचे गुरुवर्य म्हणून वैकुंठवाशी काशीगिरी महाराजांचे नावलौकिक असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुरडेश्वर येथे वैकुंठवाशी कशीगिरीजी महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
मुर्डेश्वर देवस्थान येथील विकास आराखड़ा तयार असून, येत्या आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्यात येईल. त्यापूर्वी परिसरातील रस्त्यांची कामे सुरू करणार असून येत्या जून महिन्यात मुर्डेश्वर परिसरात नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीला चालना देणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी काशिगीरीजी महाराजांच्या स्मृतिस्थळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुष्पहार अर्पण करुण अभिवादन केले. पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. खांदेश भागातून मांडे, केळगाव ग्रामस्थाकडून चपात्या तर कृष्णा लहाने यांच्याकडून आमरस व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी रामभाऊ राऊत समाजप्रभोदनपर मनोगतात म्हणाले की, काशीगिरीजी निस्वार्थी सन्याशी होते. समस्त जनतेसाठी त्यांनी वेळ दिला. म्हणून देवस्थानला लोकाश्रय प्राप्त मिळाला. मुरडेश्वर देवस्थानने पावित्रय जपले.
सेवानिवृत प्राचार्य नामदेवराव चापे म्हणाले की, काशीगिरी महाराजांनी संपूर्ण आयुष्य जनसम्पर्क व जनसेवेत अर्पित केले. स्वत:च्या तबियतिकडे दुर्लक्ष करीत इतरांचे भले होन्यासाठी प्रयत्न केले. म्हणूनच देवस्थानचा जागृतपना ज्वलंत, जिवंत राहिला.
यावेळी मुरडेश्वर संस्थानचे पिठाधिश ओमकागिरी महाराज,दयानंद महाराज,स्वातहानंद सरस्वतीगिरी महाराज,सर्वानंदगिरिजी महाराज त्रिम्बकेश्वर, त्र्यंबक महाराज काकड़े, श्वासानंद महाराज, प्राचार्य नामदेवराव चापे,कृष्णाजी लहाने ,जिल्हा बैंक उपाध्यक्ष अर्जुन गाढ़े, कृउबा समितीचे उसभापती नंदकिशोर सहारे, संचालक दामूअण्णा गव्हाने, सतीश ताठे, राजेंद्र ठोम्बरे सोमनाथ कोल्हे, संतोष जाधव, शेषराव जाधव, बद्रीनाथ पाटिल यांच्यासह ह.भ.प.भगवान महाराज, ह.भ.प.रामेश्वर पवार महाराज, ह.भ.प.मनोज भाग्यवंत , ह.भ.प.माणिक महाराज, ह.भ.प.समाधान महाराज, ह.भ.प.बाबुराव महाराज, ह.भ.प.पारस महाराज, ह.भ.प.विठ्ठल महाराज यांच्यासह आदी सह साधु संत भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन रायभान जाधव यांनी केले.