धुळ्यात दहावी- बारावीचे विद्यार्थी आक्रमक
धुळे (विक्की आहिरे) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागला. आता शिक्षण मंत्र्यांनी दहावी बारावीच्या परीक्षा संदर्भात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा (Online Exam) घेण्याचा निर्णय घेतल्याची अफवा पसरली. यावरून दहावी बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले.
कोरोनामुळे (Corona) शाळा बंद असल्याने वर्षभर ऑनलाईन पद्धतीने लेक्चर तसेच अभ्यास केल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल; अशी अफवा पसरली होती. हा घाट शिक्षण मंत्र्यांकडून का घेण्यात येत आहे? असा प्रश्न यानिमित्ताने या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. मग परीक्षाही ऑनलाईनच हवी. अभ्यास ऑनलाईन पद्धतीने (Online Education) झाला आहे. तर ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने बदलावा व ऑनलाईन पद्धतीने दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी या आक्रमक विद्यार्थ्यांनी केली आहे. यासंदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाईनक्लब परिसरात दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने केले. तसेच या संदर्भात जिल्हाधिकार्यांना याबाबतचे निवेदन देखील या विद्यार्थ्यानतर्फे देण्यात आले आहे.