शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सैदाणे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल !
पहिल्या पत्नी वैशाली सैदाणे व मुलीला हॉकी स्टिक लोखंडी रॉड ने मारहाण
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील तहसीलदार सुनील सैदाणे यांच्या सह दोन महिला अशा पाच जणांनी पहिल्या पत्नी वैशाली सैदाणे व मुलीला हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉड ने मारहाण केली असून बेकायदेशीर रित्या गर्दी केल्याचा गुन्हा शिंदखेडा येथील पोलिस स्टेशन ला नोंदविला आहे.
शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सैदाणे यांच्या पहिल्या पत्नी वैशाली सुनील सैदाणे (वय- 46 व्यवसाय गृहिणी रा- नाशिक प्लाट क्रं-7 कमलविहार अपार्टमेंट एच.डी.एफ.सी.हाऊसच्या मागे, गंगापूर, नाशिक ) यांनी धुळे येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबावरुन शिंदखेडा पोलिस ठाण्यात शुन्य क्रंमाकाने गुरुवारी उशिरा पर्यंत तहसीलदार सुनील महादु सैदाणे सह मिना अशोक घोडके उर्फ मीनल सुनील सैदाणे, दयाराम बाबुलाल सोनवणे, शिक्षक योगेश पवार व त्यांची पत्नी निशा योगेश पवार सर्व रा – शिंदखेडा यांनी सोमवारी सायंकाळी( दि.30) साडेपाच च्या सुमारास शिंदखेडा शहरातील गायत्री नगर येथे पहिल्या पत्नी वैशाली सुनील सैदाणे व मुलगी अनधा सुनील सैदाणे यांस हाॅकी स्टिक आणि लोखंडी रॉड ने जबर मारहाण केली होती. त्यात जखमी झाले आहेत. त्यानुसार शिंदखेडा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली नोंद झाली असून त्याबाबत हवालदार एकलाख पठाण पुढील तपास करीत आहेत.
त्याचप्रमाणे न्यायालयाचा आदेश आहे की, वैशाली सैदाणे यांनी आमच्या घरी येवू नये. तरी त्या सोमवारी (दि.30) सायंकाळी आमच्या घरी येवू न आम्हाला मारहाण केली होती अशी फिर्याद त्याच दिवशी शिंदखेडा येथील पोलिस स्टेशन ला तसा गुन्हा दाखल झाला आहे. अशी परस्परविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हयापुर्वीच एक मेला पहिल्या पत्नी वैशाली सैदाणे सह आपल्या दोन मुलांसह तहसील कार्यालयासमोर न्याय हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते. त्यात शिरपूर येथील उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांनी मध्यस्थी करून उपोषणकर्ते ह्यांना इन कॅमेरा द्वारे तहसीलदार सुनील सैदाणे यांच्या विरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.