चोपडा
बालमोहन विद्यालयात माझ्या स्वप्नातील भारत पोस्टकार्ड स्पर्धा
चोपडा (विश्वास वाडे) भारतीय डाक विभागामार्फत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमावर थेट पंतप्रधान कार्यालयात १९४७ चा भारत व स्वातंत्र्य समरातील अज्ञात स्वातंत्र्यवीर या विषयावर पत्र लिहून पाठवले जाणार आहेत.
विद्यालयात पत्र लिखाणाला सुरुवात झाली आहे. देश स्वतंत्र झाला त्यावेळी अनेक थोर समाजसेवक,क्रांतिकारक शहीद झाले.प्रत्येकाचे कार्य खूप मोलाचे ठरले आहे. अशेच ज्ञात अज्ञात व्यक्तींबद्दल माहिती आपल्याला पत्रातून सादर करावयाची आहे. असे मार्गदर्शन उपशिक्षक गोपाल पाटील यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयाचे व्यवस्थापक दिवाकर नाथ मुख्याध्यापक प्रदीप चौधरी, मुख्याध्यापिका रेखा पाटील, डाक अधिक्षक दुसाने, सहाय्यक डाक अधिक्षक म्हस्के, जाधव डाक निरीक्षक चौधरी व सैंदाने, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.