शिंदाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे खा. उन्मेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पाचोरा (प्रतिनिधी) जि.प. गटात विकासकामाची गंगा आणारे जि.प सदस्य मधुभाऊ काटे यांच्या गटातील शिंदाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा उद्घाटन सोहळा खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
या उदघाटन सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हापरिषद अध्यक्षा जळगाव रंजना प्रल्हाद पाटील, पाचोरा व भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हापरिषद जळगावचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, भा.ज.पा.तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील, तालुका आरोग्य अधिकारी समाधान वाघ, बीडीयो आतुल पाटील याची उपस्थिती होती. तसेच पिंपळगाव गटात विकासाची गंगा आणणारे विकास पुरुष, मधुभाऊ काटे यांचे पाचोरा- भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पापाटील यांनी तोंड भरुन कौतुक केले.
खासदार उन्मेश पाटील यांनी पिंपळगाव- शिंदाड गटात विकासाची गंगा आणणारा विकास पुरुष अशी मधुभाऊ काटे यांना उपमा देऊन केलेल्या कामाची पावतीच दिली. तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी तर येणाऱ्या निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी भाजपातर्फे मधूभाऊ काटे यांना ग्रीन सिग्नल देऊन टाकला. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर भाऊ तांबे व उपसरपंच नरेंद्र पाटील, सदस्य चेअरमन समाधान पाटील, पिपळगाव व शिदाड गटाटील सर्व सरपंच, आशासेविका, आरोग्यसेवक, ग्रामसेवक, पत्रकार ग्रामस्थ उपस्थित होते.