आर्वी पोलीस दुरक्षेत्र नूतनीकरणाचे एसपींच्या हस्ते उदघाटन
आर्वी (करण ठाकरे) धुळे तालुक्यातील आर्वी पोलीस दुरक्षेत्राचे नूतनीकरण व सुशोभिकरणाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई- आग्रा महामार्गवरील आर्वी मोघण चौफुली येथील आर्वी पोलीस दुरक्षेत्राचे नूतनीकरण व सुशोभित करून प्रजासत्ताक दिनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी धुळे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उप विभागीय पोलिस अधिक्षक प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, आर्वी पोलीस दुरक्षेत्राचे उपनिरीक्षक प्रकाश पाटील, आर्वी पोलीस दुरक्षेत्राचे पो. है. कॉ. योगेश सोनार, पो. ना. पवन मंडाले, सुमित ठाकुर, गणेश बोरसे, भूषण पाटील, चंद्रकांत माळी, नितीन दिवसे,निलेश पाटील उपस्थित होते. यावेळी आर्वी पोलीस दुरक्षेत्राचे नवीन प्रवेशद्वार करून आजूबाजूला संपूर्ण जाळी लावून विविध फुलांची झाडे नारळाची लावली आहेत. रंगरंगोटी करून ध्वजारोहणाचा आकर्षक ध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. पोलीस दुरक्षेत्राच्या नवीन लाईटींग बोर्डसह गेट बसविण्यात आले आहे. यावेळी पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी उद्घाटन केले.
यावेळी नवीन सुशोभीकरण पाहून समाधान व्यक्त केले. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील आणि सहकारी यांनी केलेल्या कामाचे पोलिस अधिक्षक यांनी कौतुक करुन मार्गदर्शन केले. तसेच अरुण अहिरे यांना कोरोना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. सदस्य किशोर आल्लोर, पं. स. सदस्य जिभाऊ शेणगे, लोकनियुक्त सरपंच नागेश देवरे, उपसरपंच विश्वनाथ सोनवणे, ग्रामविकास अधिकारी सुनील देसले, ग्राम सदस्य दिलीप देसले, तुकाराम गर्दे, माजी सरपंच विनायक केले, किशोर देवरे, विठ्ठल पाटील, माजी सरपंच भगवान देवरे, ज्ञानेश्वर गर्दे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रुपेश पाटील यांनी केले.