वाहनांच्या गर्दीत घुसून आ. चंद्रकांत पाटील यांनी हजारो वाहनधारकांना दिला दिलासा ; पाटलांच्या ट्रॅफिक पोलिसांच्या भूमिकेची चर्चा
बोदवड (प्रतिनिधी) मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सामान्य वागणुकीने असामान्य किस्से सर्वसामान्य माणसाला नवीन नाहीत. जिथे कमी तिथे आम्ही या त्यांच्या समाजशील तत्त्वांचा परीचे काल शनिवारी हजारो नागरिकांना आला. प्रचंड गळलेल्या रहदारीला स्वतः वाहनांच्या गर्दीत घुसून त्यांनी हजारो वाहन धारकांना दिलासा दिला. त्यांच्या या ट्रॅफिक पोलिसांचे भूमिकेची चर्चा मतदारसंघात दिवसभर सुरू होती.
दिनांक २९ रोजी दुपारी मतदार संघातील नाडगाव (बोदवड) रेल्वे गेट बंद असल्याने येथे वाहनांची प्रचंड गर्दी झाली रेल्वे गेट उघडले असता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. रेल्वे गेट उघडल्यानंतर सुद्धा वाहतूक सुरळीत होत नव्हती. यावेळी मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर हुन बोदवड येताना गेटवर ताटकळत होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने लक्षात येताच आमदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन रहदारी सुरळीत करायला सुरुवात केली. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केल्यानंतर शिरसाळा दर्शनासाठी इजा करणारे भाविक मतदारसंघातील लोकांनी आश्चर्य व कौतुक केले.
शनिवारी दुपारी बारा ते दोन वाजेपासून माडगाव रेल्वे गेट दूध तरफा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने बोदवड ते मुक्ताईनगर रस्त्यावर वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना समोर दोन तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने नियोजन इत ठिकाणी पोहोचण्यास उशीर आला समोर जावं लागलं. या शनिवारी असले शिरसाळा मारूती या जागृत देवस्थान आवक ये-जा करणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. तरी दरम्यान सुमारे रेल्वेचे पाच ते सहा रेल्वे गाड्या पास होत असल्याने रेल्वे फाटक बंद असल्याने रेल्वे फाटक दरम्यान रस्त्यावर वाहकांचा भगवानांना लांबच लांब रांगा लागल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन प्रवास करणार्या प्रवाशांची प्रचंड हाल झाले. या रेल्वे गेटवर निर्माती त असलेल्या उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.