शिंदखेडा तालुक्यातील साहूर येथे गावठाण क्षेत्रातील चाऱ्याला आग
अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे व तलाठी मनोहर पाटील यांची घटनास्थळी भेट
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील साहूर येथे तापी नदी काठावरील गावठाण क्षेत्रातील चाऱ्याला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली.
घटनेची माहिती मिळताच अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे आणि तलाठी मनोहर पाटील रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी ठाण मांडून होते. साहूर ता शिंदखेडा येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत शेतकऱ्यांनी गुरांसाठी साठवून ठेवला चारा संपूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. आगीने रौद्ररूप धारण केले होते. चाऱ्याचे झालेल्या नुकसाणीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून पुढिल येणाऱ्या काळात गुरे कशी जगवावीत हा यक्ष प्रश्न पडला आहे. गावकऱ्यांच्या मदतीने व दोंडाईचा , शिंदखेडा नगरपरिषदेच्या अग्निशमन बंब यांना तात्काळ पाचारण करण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आग आटोपल्यानंतर नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत. मात्र घटनेची माहिती मिळताच महिला अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे, तलाठी मनोहर पाटील यांनी लागलीच साहूर येथे जात रात्री उशिरापर्यंत ते घटनास्थळी ठाण मांडून होते. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.सदर आग विझवण्यासाठी गावातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जि.पं.सदस्या सुनिता सोनवणे यांनी प्रशासनाची चक्र फिरवत सोबत सोमा आखडमल, कौतिक आखडमल, गुलाब सोनवणे० ,नानाभाऊ सोनवणे, पोलीस पाटील मोहन सोनवणे, संजय कोळी ,आत्माराम कोळी, योगेश कोळी, विजय कोळी, गणेश कोळी यांच्यासह अनेक तरुणांनी मेहनत घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.