परीक्षा पद्धतीमध्ये समानता ठेवत परीक्षा ऑफलाईन एम सी क्यू पद्धतीने घाव्यात ; सुरज देसले व भारतीय जनता युवा मोर्चा यांची मागणी
शिंदखेडा (यादवराव सावंत) महाराष्ट्रातील विविधविद्यापीठांमध्ये शिकणारे तमाम विद्यार्थी त्यांच्या परिक्षांच्या बाबतीत चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या बाबतीत राज्य सरकारचे व शिक्षण मंत्री म्हणून खासकरून आपली भूमिका अतिशय उदासीन आहे. विद्यार्थी वारंवार परीक्षा ऑफलाईन एम सी क्यू पद्धतीने घेण्यात याव्यात अशी मागणी करीत असताना आपण मात्र या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. हा विषय कुलगुरूंकडे टोलवत असल्याची टीका विद्यार्थी बांधव करीत आहेत.
कोरोना काळात आपण डिझास्टर ऍक्ट चा वापर करीत तुमचा निर्णय सर्व विद्यापीठांवर लादतात. सध्याची स्थिती ही त्याच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेली परिस्थिती असल्याने व अजूनही शैक्षणिक यंत्रणांची गाडी व्यवस्थित रुळावर आली नसल्याने आपण पूर्वीप्रमाणे यावेळी स्वतःचा अधिकार वापरून सर्व परीक्षा समान पद्धतीने होण्याचे निर्देश देणे अपेक्षित आहे. जर प्रत्येक विद्यापीठ परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ लागले तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा तुलना आपण कशी काय करणार ? आपल्या राज्याचे विद्यार्थी जर इतर राज्यांच्या तुलनेने मागे राहिले तर या पापाची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का ? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? असा जळजळीत प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येतोय. झोपेचे सोंग घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देत नाही आपण शुद्धीत आहात का?
नागपुर ,जळगाव, गोंडवाना विद्यापीठ परीक्षा ऑफलाईन एम सी क्यू पद्धतीने घेत आहे आणि पुणे ,अमरावती, व तत्सम इतर विद्यापीठ परीक्षा संपूर्ण ऑफलाइन पद्धतीने (वर्णनात्मक) घेत आहेत .शिक्षण मंत्री म्हणून आपल्या या विषयावर कंट्रोल का नाही ? विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकवला गेला आहे काही ठिकाणी अभ्यासक्रम शिकवून पूर्ण ही झालेला नाही, आपण विद्यार्थ्यांना प्रश्न पेढी ( क्वेश्चन बँक)देण्याची घोषणा केली होती . परंतु प्रत्यक्षात मात्र असे घडलेच नाही अशी स्थिती सर्वदूर महाराष्ट्रात असल्याने केवळ ह्या वेळेला परीक्षा ऑफलाइन एम सी क्यू पद्धतीने घ्यावेत अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत . आपण व आपल्या सरकारने झोपेची घेतलेले हे सोंग तात्काळ सोडावे व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अन्यथा विद्यार्थी तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत . तसेच लाखो विद्यार्थ्यांच्या रोष आपल्या प्रति व्यक्त होत राहील. आपण या विषयावर त्वरित सकारात्मक विचार करून निर्णय करावा अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा सातत्याने विद्यार्थ्यांसोबत हा लढा देत राहील . विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून संघर्ष करेल अशा आशयाचे लेखी निवेदन जिल्हाध्यक्ष सुरज देसले भारतीय जनता युवा मोर्चा यांनी तहसीलदार यांना दिले आहे.



