क्रेडिट कार्ड धारकांसाठी आरबीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्डला यूपीआयशी (यूनिफाइड पेमेंट इंटरफेस) जोडण्याची मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे क्रेडिट कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यूनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजे काय ?
आरबीआयचा निर्णय समजून घेण्यासाठी सर्वात आधी यूपीआय म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे. यूपीआय अॅप हे अनेक बँक खात्याशी जोडता येते. त्यामुळे तुम्ही सहज पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पाठवू शकता. हे पेमेंट करण्यासाठी अधिकृत पिन क्रमांक जोडावा लागतो, त्यानंतरच आपण या अॅपमधून पेमेंट करू शकतो.
नवीन सुविधा काय आहे ?
दरम्यान, या आधी केवळ डेबिट कार्डमार्फत यूपीआयसोबत बँकेचे बचत खाते जोडू शकत होता. मात्र, आता आरबीआयने क्रेडिट कार्ड देखील यूपीआयसोबत जोडण्याची मान्यता दिली आहे. आरबीआयच्या या नवीन सुविधेमुळे डिजिटल व्यवहाराला आणखी प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच डिजिटल पेमेंट करण्याचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. या पर्यायामुळे शॉपिंगपासून ते पैसे ट्रान्सफर करू शकतो. या निर्णयामुळे क्रेडिट कार्ड धारकांना नवा पर्याय मिळाला आहे.