सिल्लोड येथे महेश नवमी उत्साहात साजरी
सिल्लोड : सिल्लोड येथे महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील माहेश्वरी समाज बांधवांच्या वतीने महेश नवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. महेश नवमी निमित्ताने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शहरातील महेश स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महेश नवमी निमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नगरसेवक रउफ बागवान, मनोज झंवर, नॅशनल सुतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, माहेश्वरी समाजाचे तालुकाध्यक्ष रमेश लाठी, राधाकीसन मानधने, गोपालसेट चांडक, रमण बडाळे, सत्यनारायण गट्टानी, संजय झंवर, मनोज झंवर, सुभाष दरक, आत्माराम अग्रवाल, गिरीश शहा, गोविंद लाठी, योगेश दरक, योगेश झंवर, पियुष होलानी, बालाप्रसाद गट्टानी , दामोदर मालपाणी, शुभम गट्टानी आदींची उपस्थिती होती.