शिंदखेडा येथे भाजपच्या वतीने राज्यसभेतील तीन आमदार विजय झाल्याचा भगवा चौकात जल्लोष
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील भगवा चौकात आज शिंदखेडा तालुका व शहर भाजपाच्या वतीने नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत पियुष गोयल, डॉ.अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांचा विजय झाल्याने भाजपाचे नेते कामराज निकम व नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून व पेढे भरून जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र राज्यातील सहा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया चांगलीच रंगतदार ठरक होती भाजपा व महाविकासआघाडी यांच्यात सहा आमदार निवडीसाठी रस्सीखेच सुरू होती अखेर काल भाजपाचे आमदार पियुष गोयल ,डॉ. अनिल बोंडे ,धनंजय महाडिक यांनी विजयश्री खेचून आणली महा विकास आघाडीच्या वतीने संजय पवार तर भाजपाच्या वतीने धनंजय महाडिक हे सहाव्या जागेसाठी रिंगणात होते. या भाजपाने यशस्वीरित्या धनंजय महाडिक यांना विजय करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस तसेच शिंदखेडा मतदार संघातील माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल यांनी विशेष प्रयत्न करून विजय मिळवून दिला. त्याबद्दल भाजपाचे निवडून आलेले तीनही आमदार यांचा आज शिंदखेडा तालुका भाजपा व शहराच्या वतीने भगवा चौकात फटाक्यांची आतिषबाजी व एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपाचे शिंदखेडा मतदार संघाचे कुशल नेतृत्व असलेले नेते कामराज निकम, नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, युवराज माळी, माजी उपनगराध्यक्ष भिला बारकू पाटील , उपनगराध्यक्ष प्रकाश नागो देसले, शहराध्यक्ष प्रवीण माळी,रेल्वे प्रवासीचे तालुकाध्यक्ष दादा मराठे, दीपक चौधरी,प्रकाश चौधरी, दिनेश सूर्यवंशी, दयाराम देवराम माळी, देविदास नारायण माळी, धर्मराज नागो माळी, अशोक शंकराव देसले ,स्वीकृत नगरसेवक अरुण देसले, गणेश मराठे ,संजय माळी, उमेश गिरासे ,संभाजी देसले, गोकुळ शिवदास माळी, चेतन परमार, अँड. विनोद पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्यसभेतील आमदारांची झालेले निवडणूक ही माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस व माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल तसेच राज्यातील सर्वच भाजपाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन आपल्या तीन जागांवर विजय मिळवून दिला आणि महा विकास आघाडीला जोरदार चपराक दिली आहे त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या निवडणुकीद्वारे बरेच काही अनुभवता आले भविष्यात निश्चितच भाजपच्या माध्यमातून आम्ही पदाधिकाऱ्यांचे आदेश पाडून सर्वसामान्य गोरगरिबांचे कामे करण्यासाठी तत्पर राहू असे त्यांनी सांगितले.