जळगाव जिल्हा

भुसावळ भाजपाने केला राज्यसभा निवडणूक विजयाचा जल्लोष

भुसावळ (ओमशंकर रायकवार) महाराष्ट्रातुन राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री डॉ‌ अनिल बोंडे‌ तसेच धनंजय महाडीक निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे फटाके फोडुन व लाडू वाटप करून शहरात जोरदार जल्लोष करण्यात आला. सदरील जल्लोषात कार्यकर्त्यां द्वारे जोरदार घोषणा करण्यात आल्या या जयघोषाने संपूर्ण परिसर गजबजुन निघाला.

 

सदरील निवडणुकीमध्ये कोट्या नुसार भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार निवडून येण्याची शक्यता असतांना योग्य नियोजनामुळे भारतीय जनता पार्टीचे तीन खासदार दणदणीत विजयी झाले असुन या विजयामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका या पूर्ण ताकतीने लढवून भारतीय जनता पार्टी आपला झेंडा भुसावळ नगरपालिकेवर पुन्हा फडकविण्या साठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे दिसुन येत आहे.

 

सदरील जल्लोषास भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर, प्रा दिनेश राठी, राजेंद्र आवटे, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, अजय नागराणी , शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, खुषाल जोशी, गिरीश पाटील,किरण सरोदे, नारायण रणधीर, जयंत माहुरकर, सदाशिव पाटील, राजू खरारे, शिशिर जावळे, अनिल पाटील, चंद्रशेखर पाटील, विशाल जंगले, प्रवीण इखनकर,प्रशांत देवकर,धनराज बाविस्कर,महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, बेटी बचाव अभियानाच्या अध्यक्षा भारती वैष्णव, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, ओबीसी मोर्चाचे भावेश चौधरी,चेतन बोरोले,किरण मिस्त्री ,राहुल तायडे ,शेखर धांडे , प्रा विलास अवचार, संजय बोचरे ,भरत पटेल,व्यापारी आघाडीचे सागर चौधरी, योगेश चौधरी, संतोष ठोकळ, नंदकिशोर बडगुजर, चेतन सावकारे, गोपीसिंग राजपुत, लखन रणधीर, लोकेश जोशी, सागर जाधव, स्वप्निल कुरकुरे आदी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे