महाराष्ट्र
काटेपिंपळगाव येथील जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी रायटींग पॅड वाटप
वैजापूर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या वाढदिवसा निमित्ताने काटेपिंपळगाव येथील जि.प. शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना परीक्षा काळामध्ये रायटींग पॅड गरज असते. आमदार बोलणारे म्हटले की, माझ्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचा खर्च मी करणार नाही त्या खर्चा बदली मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोरगरीब विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे रायटींग पॅड वाटप करणार आहे.
आमदार रमेश बोरणारे यांनी काटे पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गावकरांच्या हस्ते प्रत्येक मुलाला रायटींग पॅड वाटप केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सगळे, सुभाष कानडे, पंचायत समिती सदस्य बद्री चव्हाण व समस्त शिक्षक वृंदावन व गावकरी रामभाऊ धोत्रे, नानाभाऊ धोत्रे, नवनाथ जगताप, येडू धोत्रे आदी उपस्थित होते.