अमळनेरआरोग्य व शिक्षण

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

अमळनेर (नूरखान) तालुक्यात देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये दहावीचा निरोप समारंभ वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. शाळेत विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी यशस्वी पाटील बेस्ट स्टुडंट आवार्ड 2021- 22 देण्यात आला. शाळेत मागच्या वर्षी दहावीत प्रथम येणाऱ्या हर्षल माधवराव पाटील याला रोख पारितोषिक देण्यात आले. इयत्ता 10 वी तील विद्यार्थ्यांनी शाळेला शिवाजी महाराजांचा पुतळा व वर्गशिक्षक ईश्वर महाजन यांना भेटवस्तू देऊन सन्मान केला. अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विलासराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल व डॉ शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार शाळेचे शिक्षक ईश्वर महाजन यांना मिळाल्यामुळे सत्कार करण्यात आला.

दहावीच्या निरोप समारंभ प्रसंगी व वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी सांगितले की जिद्द आणि चिकाटी तुमच्याजवळ असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. त्यासाठी भरपूर मेहनत करा व येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत यश संपादन करून गावाचे व शाळेचा नावलौकिक करावा असे सांगितले. देवगाव देवळी ही उपक्रमशील शाळा आहे व त्या शाळेचा संस्थाचालक म्हणून मला अभिमान आहे असेही त्यांनी सांगितले व शिक्षकांच्या उपक्रमाचे हे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय आर महाजन यांनी केले तर आभार प्रर्दशन एस .के. महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एच.ओ माळी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे