मालपुर येथे विविध कार्यकारी सोसायटीवर १३ उमेदवारांची झाली बिनविरोध निवड
मालपुर : मालपुर ता.शिंदखेडा जिल्हा धुळे येथील विविध कार्यकारी सोसायटीवर 13 उमेदवारांची बिनविरोध निवड त्यात भाजपचे 7 उमेदवार महावीरसिंह रावल (जिल्हा परिषद सदस्य) यांनी नेतृत्व केले.
हेमराज (नाना) पाटील (सरपंच मालपुर तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी) विरेंद्र गोसावी (सरपंच मालपुर), राजेंद्र आखडमल (उपसरपंच मालपुर), यांनी महाविकास आघाडी चे नेतृत्व केले. १३ उमेदवारांनी फाॅर्म भरले. त्यांच्या व्यतीरिक्त कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही म्हणुन बिनविरोध निवडची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडी विजयी उमेदवार सदाशिव गोसावी, प्रकाश पाटील, दिलीप नागो कोळी, सिताराम बुधा माळी, दिनकर बारकु शिवदे, कल्पनाबाई शांतीलाल धनगर सर्व विजयी उमेदवारांचे सत्कार करण्यात आला व शाम सनेर (जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्ष धुळे ग्रामीण), ज्ञानेश्वर आबा भामरे (जिल्हा परिषद सदस्य धुळे), हेमंतराव देशमुख (कामगार कल्याण मंत्री), महाविकास आघाडी चे सर्वे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते व निवड झालेल्यांचे स्वागत करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन गिरीश महाले यांनी काम पाहिले.