बंडखोर आमदारांच्या गटात आहेत या अभिनेत्रीचे पती.
मुंबई: ०५ जुलै २०२२
सध्या मोठ्या आणि छोट्या पडद्यापासून दूर गेलेल्या अभिनेत्रीचे पती बंडखोर आमदारांच्या गटात आहेत. करीअर जोमात असतांना अनेक अभिनेत्री आपल्या संसारात रममान होण्यासाठी सिनेसृष्टीपासून चार हात लांब गेल्या आहेत. त्यापैकीच एक अभिनेत्री आहे निलम शिर्के.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत लग्न केल्यानंतर संसारात रममान झालेल्या या अभिनेत्रीचे सध्या रत्नागिरीत वास्तव्य आहे. अभिनेत्री निलम शिर्के हिचे सिनेसृष्टीत आगमन होण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
अभिनेत्री नीलम शिर्केनं अनेक मराठी मालिकांसह चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. वादळवाट, असंभव, राजा शिवछत्रपती यासारख्या मालिकांमधून निलम प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही मालिका अथवा चित्रपटात ती दिसली नाही. त्यामुळेच नीलम सध्या काय करते? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.