भागवत कराड यांच्यातर्फे ग्रीनग्लोबल फाउंडेशनच्या वतीने बेंदवाडी येथे शेतकऱ्यांना मोफत बिज वाटप
वैजापूर : तालुक्यातील बेंदवाडी येथे 53 शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ भागवत कराड यांच्यातर्फे भाजपा तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनिल पा.वाणी, ता. उपाध्यक्ष भिमसिग राजपुत, यांच्या हस्ते मोफत बिज वाटप करण्यात आले.
त्या वेळेस बुथ अध्यक्ष गणेश कहाटे, अर्जुन कहाटे , कैलास गोमलाडु, विलास डोगरजाळ बाबुलाल गोमलाडु, प्रेमसिग बेडवाल, विठ्ठलसिग कहाटे, विजय बेडवाल, प्रकाश बेडवाल सह सर्व लाभधारक शेतकरी बांधवाची उपस्थीती होती. त्यावेळेस मार्गदर्शन पर कल्याण दांगोडे यांनी शेतकऱ्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक योजना जनसामान्य जनते पर्यंत पोहचवण्याचे भारतीय जनता पार्टीचे आमचे उद्दिष्ट आहे. सबका साथ सबका विकास हि संकल्पना घेऊन आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना मदतीचा हात देत आहोत जनसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणे आमचे उद्दीष्ट आहे असे त्यानी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त केले.