विश्वकल्याण मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी लि.औरंगाबाद सोयगाव शाखेचा उद्घाटन संपन्न
सोयगाव : सोयगाव शहरात विश्वकल्याण मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी लि.औरंगाबाद शाखा सोयगाव या शाखेचे उद्घाटन दि.१४ मंगळवार रोजी सकाळी ११:०० वाजता सोयगाव तहसीलचे नायब तहसीलदार व्ही.टी.जाधव व सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अॅड अभिषेक भैय्या जैस्वाल चेअरमन, आशिष जोशी अध्यक्ष, विनोद अमृतकर मुख्य कार्यकारी अधिकारी, संदीप भारुडे झोनल मॅनेजर, चंद्रशेखर देशमुख मॅनेजर सोयगाव, तसेच यावेळी शहरातील सोयगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विवेक महाजन, सोयगाव व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष निकेश बिर्ला,नगरसेवक राजेंद्र दुतोंडे, नारायण घनगाव, भैरवनाथ पतसंस्थेचे मॅनेजर धनराज औरंगे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आनंदा इंगळे, माजी सरपंच जिवन पाटील, कै.बाबुरावजी काळे पतसंस्थेचे संचालक योगेश बोखारे, सागर गायकवाड, माजी नगरसेवक योगेश मानकर, संदिप चौधरी, दत्तू सोनवणे, हे उपस्थिती होते. तसेच सोयगाव शहरातील व्यापारी, पत्रकार, विविध पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व विश्वकल्याण मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी लि.औरंगाबाद शाखा सोयगावचे कर्मचारी शुभम देसले, सुमित खिरडकर,लक्ष्मण तेलंग्रे आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.