शिंदखेडा येथील वटपौर्णिमेला महिलांनी वडाची लागवड करून केले पूजन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा शहरातील साईनगर येथे राहणाऱ्या महिलांनी वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून वडाची लागवड करून विधिवत पुजन केले.
वटसावित्री पौर्णिमेला महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभून सात जन्म हा पती म्हणून मिळाला. यासाठी वडाची पूजा करून हे व्रत करतात. काही वर्षां पासून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचे समतोल बिघडले आहे. तापमानात झालेली वाढ, अति वृष्टी या सारख्या नैसर्गिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. या संकटापासून वाचण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व जाणून साई नगर येथील राहणाऱ्या रत्नाबाई देविदास चौधरी, सारिका विनोद चौधरी, रुपाली योगेश चौधरी, करिष्मा सुशील चौधरी, नीता डिगंबर पाटील या महिलांनी वडाची लागवड करून विधिवत पुजन केले. दरवर्षी वटसावित्री पोर्णिमेला वडाची लागवड करण्यात येते. याप्रसंगी रुपाली चौधरी यांनी वटपोर्णिमेला महिलांना कमीत कमी एक वडाची लागवड करून संगोपन करावे असे आवाहन महिलांना केले. वृक्ष लागवडीसाठी महिलांना वडाचे रोप वृक्ष संवर्धन समिती शिंदखेडा च्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले होते.