शेठ. ला.ना. सा.विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. संजय वानखेडे यांना जिल्हास्तरीय म.फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त.
जळगांव विशेष प्रतिनिधि
दिनांक: ०५ डिसेंम्बर २०२२
जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री संजय भादूजी वानखेडे यांना या वर्षाचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रोटॉन शिक्षक-शिक्षकेतर संघटनेतर्फे रविवार दिनांक ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत अल्पबचत सभागृह,जळगांव येथे संपन्न झालेल्या प्रोटॉन जिल्हास्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण समारंभात जिल्हास्तरीय म.ज्योतिबा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रमुख अतिथी जळगांव जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी श्री. ए.आर.शेख ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.विजय पवार,श्री.जे. डी.पाटील,प्रोटॉन संघटनेचे उपाध्यक्ष श्री.गणेश काकडे,जिल्हाध्यक्ष श्री.मिलिंद भालेराव आदींच्या प्रमुख उपस्थित स्मुर्तीचिंह,प्रशस्तीपत्र,व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .श्री.संजय वानखेडे हे जळगांव येथील नामांकित शेठ. ला.ना. सा.विद्यालयात गेल्या २७ वर्षापासून सेवारत असून त्यांनी आतापर्यंत प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या SET,NET.या परीक्षा उत्तीर्ण केल्या असून शालेय संगणक विभाग,विज्ञान मंडळ,अंधश्रद्धा निर्मूलन समिती,इंटरॲक्ट क्लब,शालेय विधी साक्षरता कक्ष ,प्रसिद्धी विभाग,शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग,महाराष्ट्र प्रज्ञा शोध,राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा,टिळक महाराष्ट्र िद्यापीठ परीक्षा मार्गदर्शन वर्ग,,सांस्कृतिक विभाग,सायन्स ऑलिमपियाड स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, इ.१० वी बोर्ड गणित,विज्ञान विषय परीक्षक व नियामक म्हणून उल्लेखनिय कार्य केले असून जळगांव जिल्ह्यातील चर्मकार समाजातील विविध सामाजिक संघटनांमध्ये ते विविध पदांवर सक्रिय कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत अनेक समाजोयोगी उपक्रम.उदा.गुणवंत विद्यार्थी /समाजबांधव सत्कार समारंभ,वधू-वर परिचय मेळावे,संत रविदास महाराज जयंती उत्सव,आरोग्य शिबीर,रोजगार मार्गदर्शन शिबिर,श्री. गणेशोत्सवात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन,समाज एकता मेळावे,समाजातील गरजू,हुशार ,गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण,रोख पारितोषिक वितरण,आदी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले असून या कार्याची दखल घेऊन जळगांव जिल्हा प्रोटॉन शिक्षक शिक्षकेतर या संघटनेमार्फत जिल्हास्तरीय म.ज्योतिबा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.या आधीही त्यांना राजनंदिनी संस्थेमार्फत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.