शिंदखेडा येथील प्रभाग चार मध्ये फेसयुक्त पाणी ; नगरसेविका साजिदाबी इंद्रिस कुरेशी यांची नगरपंचायतला निवेदनाद्वारे तक्रार
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील प्रभाग क्रमांक चार मध्ये दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नगरसेविका साजिदाबी इंद्रिस कुरेशी यांनी केली असून त्याबाबत मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना निवेदन देण्यात आले आहे.
नगरसेविका कुरेशी यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे की, शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये पिण्याचे पाणी दुषीत येत असुन सदर पाण्यात कोंबडी चे पिसे देखील येत असल्याची तक्रार मार्च महिन्यात केली असून अद्याप कोणतीही प्रकारची दखल नगरपंचायत मार्फत घेतली गेली नाही. त्यानंतर दुसरे निवेदन नुकतेच देण्यात आले असून त्याबाबत मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी प्रभाग क्रमांक चार मध्ये दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी पुरवठा तपासून त्यावर योग्य ती काळजी घेऊनच पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसेच एकवीस कोटी रुपये खर्चून येवू घातलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी यशस्वी रित्या नळकनेक्शन जोडुन शहरातील नागरिकांना दिलासा मिळवून द्यावा. तसेच स्वस्छ पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात यावा, जेणेकरुन नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने संभाव्य धोका ठरू शकतो असीही सुचना केली असून ह्याकडे लक्ष न दिल्यास नगरपंचायत समोर नगरसेविका सह नागरिकांचे सनदशीर मार्गाने लवकरच धरणे आंदोलन उभारण्यात येणार यास सर्वस्वी शिंदखेडा नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे.हयावेळी नगरसेविका साजिदाबी इंद्रिस कुरेशी, डॉ. इंद्रिस कुरेशी यांसह रहिवासी नागरिक उपस्थित होते.