महाराष्ट्र
व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रेणुका जगधने तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पवार यांची निवड
वैजापूर (अशोक पवार) जिल्हा परिषद शाळा सुदामवाडी येथे व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. अध्यक्षपदी रेणुका तुकाराम जगधने व उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील पवार यांची निवड करण्यात आली. तसेच शाळेचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक शिंदे व गावातील सरपंच आजी-माजी व पालक उपस्थित होते. तसेच गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य चांगदेव पवार, उत्तम आप्पा पवार, कैलास पवार, ज्ञानेश्वर माउली पवार, स्वप्निल पवार, अशोक पाटील पवार, दादा होले, सुनिल जगधने, तुकाराम जगधने, बाळू सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.