गुन्हेगारीमहाराष्ट्र
ए.टी.एम. मधुन चोरट्यांनी केले ऐकतीस लाख दहा हजार लंपास
दिनांक:२५ जुलै २०२२
प्रतिनिधि-सतीश बावस्कर – बोदवड येथे नाडगाव रोटवर भारतीय स्टेट बँक असुन याच बँकेचे ऐटी एम आहे दिनांक २४/७ रोजी सकाळी चारच्या सुमारास चोरट्यांनी गँस कटरच्या साह्याने सेंटरचे कुलुप कापुन आत प्रवेश करुन पाच कँरेटमध्ये असलेली रक्कम लंपास केली.
फिर्यादी बँक मॅनेजर जयेश सुभाष गंगवाल वय ३६याच्या फिर्यादी वरुण अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास ऐपि आय जाधव करत आहे तर घटना स्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एसडीपीओ कुनाल जाधव यांनी भेट दिली श्वान पथकाला सुद्धा बोलविण्यात आले होते बोदवडशहरात चोरीचे प्रमाण वाढत असुन शहरात भर रस्त्यावर बँक असुन रात्री सुरक्षा गार्ड बँक का ठेवत नाही लाखो रुपये ऐटीऐम मध्ये असतात नागरीकामध्ये बोलल्या जाते.