शिंदखेडा येथील एम.एच.एस.एस. हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्षारंभी विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव संपन्न
शिंदखेडा (यादवराव सावंत) एम.एच.एस.एस. हायस्कूल शिंदखेड़ा येथे बुधवार दिनांक 15/06/2022 या शै.वर्षा च्या प्रथम दिनी इ.5वी ते 8वी च्या विद्यार्थ्याना गुलाबपुष्प,पुस्तके व इ.9वी,10वी च्या विद्यार्थ्याना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार सहा ते चौदा वयोगटातील बालकांना शाळेत प्रवेश देवून आनंददायी शिक्षण देणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
याप्रसंगी कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य टी.एन. पाटील यांनी विद्यार्थी हा अर्जुना सारखा असावा, दुर्योधनला विशाल वृक्ष दिसतो, भीमाला वृक्षाला लागलेले फळ दिसते. कर्णाला वृक्षावरील गुरूनी ठेवलेला पोपट दिसतो पण अर्जुनला त्या पोपटाचा डोळा दिसतो. असे आदर्श शिष्य विषयीचे मत मांडले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक आर.पी. चौधरी, एस.एन. नेरपगार,व्ही.एस माळी व सर्व हायस्कूलचे शिक्षक बंधुभगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.जी. शिंपी यांनी केले, प्रास्ताविक एस.एन. पाटील यांनी सादर केले तर आर आर. सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.