महाराष्ट्र
शिंदखेडा येथील विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरज देसले यांच्याकडुन दहावी चा निकाल आँनलाईन पाहण्यासाठी मोफत सुविधा व पेढे भरून स्वागत
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा शहरात धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्या वतीने 10 विच्या विद्यार्थ्यांना मोफत निकाल पाहण्याची व मोफत निकाल पत्र मिळण्याची ओमसाई सायबर येथे सुविधा केली होती. अनेक विद्यार्थी व पालक याठिकाणी निकाल पाहण्यासाठी व निकाल पत्र घेण्यासाठी उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचा भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा मा.नगरसेवक सुरज देसले यांच्या हस्ते सत्कार करून व पेढे भरवुन अभिनंदन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरज देसले, अभिजित गोसावी, महेश गुरव, अक्षय वाणी, अमोल गोसावी,तुषार पाटील, विनोद माळी, परेश शिंपी, जयेश देसले व विद्यार्थी पालक उपस्थित होते.